लालबहादूर शास्त्री विद्यालयात संस्थापक स्व.सपकाळ व स्व. नायकुडे यांची पुण्यतिथी साजरी
करमाळा (दि.१७) – स्व. नामदेव बापू व आदिनाथ नायकुडे गुरुजी यांचे कार्य आधुनिक पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांचे कार्य हे दीपस्तंभा सारखे असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. ज्ञानदेव महाराज फुले यांनी केले.
सालसे (ता. करमाळा) येथील न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात संस्थापक स्व. नामदेव बापू सपकाळ आणि तत्कालीन सचिव आदिनाथ नायकुडे गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित व्याख्याना निमित्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक नितीन शेठ सपकाळ अध्यक्ष प्रकाश सपकाळ उपाध्यक्ष व मुख्याध्यापिका सौ. मनीषा तनपुरे सचिव रवींद्र सपकाळ शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तानाजी लोकरे तंटा मुक्ति समितीचे अध्यक्ष वैभव घाडगे संस्था संचांलक अनील घाडगे भाऊसाहेब सौ. सविता लोकरे निशा ताई सपकाळ स्व. नामदेव बापू यांच्या कन्या , माया गोमे, लिला जाधव, सुरेखा ढेरे, सुजाता जगदाळे तसेच गौरव क्लॉथ चे मालक शरद पवार जालिंदर शिंदे मेजर गोमे भारत सपकाळ संदीप सपकाळ शुभम सपकाळ सेवानिवृत्त शिक्षक मच्छिंद्र घाडगे सर पोलिस पाटील पवार सर जाधव सर बाळासाहेब घाडगे आदि मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
यावेळी पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. या वेळी कार्यक्रमासाठी सालसे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुते सर यांनी केले तर आभार घाडगे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.