केम येथील मनोज तळेकर यांना जिल्हास्तरीय “आदर्श मुख्याध्यापक” पुरस्कार प्रदान
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांचे मार्फत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपसथितीत पार पडला.
यात जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार करमाळा तालुक्यातील राजाभाऊ तळेकर विद्यालय केमचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर सर यांना प्रदान करण्यात आला.या पुर्वीही त्यांना कंदर शिक्षण प्रसारक मंडळाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला आहे.हुतात्मा स्मृती भवन सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात मा.शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा.सुभाषरावजी माने, माध्य.शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, उप शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, लेखाधिकारी मा.दयानंदजी कोकरे साहेब त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे सचिव बापू नीळ सर या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. श्री मनोज तळेकर यांनी हा पुरस्कार त्यांची आई भामाबाई,पत्नी सौ.उमा,मुलगा राज व श्री शिवाजी प्रथमिकचे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर गुरुजी यांच्या उपस्थितीत स्वीकारला.
या पुरस्कार सन्मानाबद्दल संस्था अध्यक्ष श्री महेश तळेकर सर श्री शिवाजी प्रथमिकचे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर गुरुजी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यावेळी श्री मनोज तळेकर यांच्या आजपर्यंतच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा चे 3 पुरस्कार, जिल्यातील पहिली सायकल बँक ,आदर्श शाळा 3 पुरस्कार,विद्यालयातील शिस्तप्रिय व निसर्ग रम्य वातावरण,डिजिटल पेमेंट सिस्टीम अशा अनेक आदर्श व प्रामाणिक कामाची दखल घेऊन मुख्याध्यापक संघाने पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या सेवेचा योग्य सन्मान केला आहे असे गौरव उदगार श्री शिवाजी प्रथमिकचे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर गुरुजी यांनी काढले.
माझ्या या पुरस्काराचे मानकरी माझ्या शाळेतील शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक आहेत त्याच्यामुळेच हा पुरस्कार मला मिळाला आहे त्यामुळे हा पुरस्कार मी या सर्वांना समर्पित करतो अशी भावना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर सर यांनी बोलताना व्यक्त केली.