सीए झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा केम येथील विद्यालयाकडून सत्कार संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी समाधान कदम हे चार्टर्ड अकाऊंटंट(सीए) झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
समाधान कदम हे करमाळा तालुक्यातील साडे गावचे सुपुत्र आहेत. सत्कार समारंभाच्या अध्यक्ष पदी केम येथील प्रगतशील बागायतदार दत्तात्रय बलभीम बिचितकर हे होते. या सत्कार प्रसंगी समाधान कदम म्हणाले कि माझी परिस्थिती गरिबीची होती परंतु मी या परिस्थितीचा बागलबुवा न करता जिद्द व चिकाटी या जोरावर हे यश संपादन केले. माझ्या यशात येथील गुरूजन वर्ग व माझे मामा अशोक काळे यांचा सिंहाचा वाटा आहे.
या वेळी समाधान कदम यांचे मित्र उमेश साळुंखे, गणेश परदेशी विशाल गुटाळ, मनोज बोगांळे, रोहित काळे, ब्रह्मदेव साळुंखे यांचा हस्ते सत्कार केला या वेळी संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर दगडू कदम, लहू काळे अशोक काळे, शेखर गिराम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटिल यांनी केले तर आभार अवताडे सर यानी मानले.