तालुकास्तरीय महावाचन उत्सवात विविध शाळांचा सहभाग
करमाळा (दि.४) – राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी राज्य शासनाने 2024 महावाचन उत्सव आयोजित केला आहे. वाचन चळवळ वाढावी वाचन व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचार कक्षा रुंदावते यासाठी ‘महाराष्ट्र वाचन चळवळ’ हा उपक्रम सर्व महाराष्ट्रभर राबवला आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती करमाळा कार्यालयाने स्पर्धा आयोजित केली होती.
यामध्ये तिसरी ते पाचवी गटामध्ये स्वराज बाळासाहेब बोडके जि प शाळा कोंढार चिंचोली ओंकार प्रफुल्ल रणसिंग जि प शाळा खातगाव-३, तेजस्विनी आण्णा गव्हाणे जि प शाळा खडकेवाडी यांचा अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक आला
सहावी ते आठवी गटातून १)स्नेहल वसंत राऊत नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे २)गौरी बाळासाहेब राऊत जि प शाळा घोटी ३)अनुष्का दिगंबर मावलकर नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे या विद्यार्थिनींचा अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक आला.
तसेच नववी ते बारावी गटामधून १)मेघना विलास काळे नेताजी सुभाषचंद्र विद्यालय केतुर २) ऋतुजा राजेंद्र चौधरी नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे ३)प्रियंका विलास मावलकर नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे साहेब तसेच विस्तार अधिकारी टकले यांनी अभिनंदन केले.