केममधील राजाभाऊ तळेकर विद्यालयास “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” पुरस्कार प्रदान
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयाला “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थांचे संस्थापक शिक्षण प्रेमी सहकार रत्न स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्याचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार दिला जातो.सन-2022 -23 या शैक्षणिक वर्षांमध्ये संत सोपान काका सहकारी बँक मर्यादित सासवड व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ,सोलापूर ,सातारा, सांगली ,कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान राबविण्यात आले होते.
हा पुरस्कार विभाग व जिल्हास्तरावरील वरील शाळांची पाहणी करून आरोग्य व स्वच्छता पर्यावरण, गुणवत्ता,भौतिक सुविधा,सुंदर बगीचा ,निसर्गरम्य वातावरण इत्यादी बाबीची पुरतता करणाऱ्या शाळांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केली जाते. या अभियानामध्ये राजाभाऊ तळेकर विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साठी सहभाग घेऊन फाउंडेशन ने ठरवलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करून तालुके स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष महेश तळेकर यांनी स्वीकारला. मिळालेल्या रकमेतून शाळेसाठी दोन डस्टबिन घेण्यात आले आहे. या पुरस्कारानंतर केम परिसरातून तळेकर विद्यालयाचे कौतुक करण्यात येत आहे.