शिक्षक भारतीच्या आक्षेपानंतर करमाळा तालुक्यासाठी नवीन क्रीडा समन्वयकाची निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात करमाळा तालुक्यात चालू असणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडा समन्वयक म्हणून करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्रीराम काळे यांची निवड जिल्हा क्रीडा विभागाकडून करण्यात आली आहे.
या आधी जिल्हा क्रीडा विभागाने क्रीडा स्पर्धांचे समन्वयक म्हणून करमाळा येथील मुकुंद साळुंखे यांची नेमणूक क्रीडा विभागाने केली होती. परंतु साळुंखे हे सेवानिवृत्त असल्याने त्यांच्या नेमणुकीस करमाळा येथील शिक्षक भारती संघटनेने आक्षेप नोंदवत जिल्हा क्रीडा विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मोरे यांनी शहानिशा करत साळुंखे यांची नेमणूक रद्द केली. तसेच नवीन क्रीडा समन्वयक म्हणून करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्रीराम काळे यांची निवड केली असल्याचे पत्र शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांच्याकडे दिले.