चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमधील तेजस उंबरे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण (ता. करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी तेजस उंबरे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. इरा पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी अनेक स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होत असतात, आतापर्यंत विविध विषयांमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले आहे. चिखलठाण येथील विद्यार्थी तेजस उद्धव उंबरे या विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयसाठी निवड झाली आहे, त्याच्या या निवडीबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातून त्याची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन शिक्षकांचे , पालकांचेही अभिनंदन केले जात आहे.