सुराणा विद्यालयाच्या श्रावणी गुटाळने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक - Saptahik Sandesh

सुराणा विद्यालयाच्या श्रावणी गुटाळने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक

करमाळा(संदेश प्रतिनिधी) : यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था व करमाळा तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षिका स्वर्गीय लिलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ यश कल्याणी सेवा भवन येथे काल( दिनांक 27 जुलै) तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयाची इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी श्रावणी मारुती गुटाळ हिने ७ वी ते ८ वी च्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने निसर्ग (nature) या विषयावर वक्तृत्व कला इंग्रजी मध्ये सादर केली.

या यशाबद्दल कुमारी श्रावणीचे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ करे पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व सेवक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.तसेच श्रावणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!