शिष्यवृत्ती परीक्षेत चिखलठाण येथील सुराणा विद्यालयाचे सुयश - Saptahik Sandesh

शिष्यवृत्ती परीक्षेत चिखलठाण येथील सुराणा विद्यालयाचे सुयश


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत चिखलठाण (ता.करमाळा) येथील श्रीमती रा.बा.सुराणा विद्यालयातील इ.५ वी तील ४ विद्यार्थी पात्र झाले आहेत तर इ. ८ वी वर्गातील २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

इ.८ वी वर्गातील शिवराजे भागवत साळुंके व रणजित नवनाथ मारकड या २ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,स्थानिक व्यवस्थापन समिती,स्थानिक स्कूल कमिटी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!