जेऊर येथील न्यू ईरा पब्लिक स्कूल चे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी

करमाळा,ता.२५: जेऊर ( ता.करमाळा)  येथील न्यू इरा पब्लिक स्कूल चे  दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी दि. २७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.यावेळी जास्तीत जास्त नागरिक व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्कुल च्या वतीने करण्यात आले आहे.

या स्नेहसंमेलनाचे उदघाटन जेऊर येथील जनमतातील सरपंच पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. डाॅ.बाबुराव हिरडे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश भाऊ करे पाटील उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, आदिनाथ सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी लक्ष्मण गोडसे, पंचायत समिती सदस्या सौ. ललिता धनंजय शिरसकर, शेलगावचे सरपंच अमरदादा ठोंबरे, वांगीचे सरपंच रामेश्वर तळेकर, गणेश बापू जाधव, संजय दादा गरांडे, पांडुरंग वाघमारे, गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, केंद्रप्रमुख वंदना पांडव, मेस्टा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रा. संदीपान गुटाळ  टेंभुर्णी येथील इरा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष महेंद्र वाकसे, गुरुकुल पब्लिक स्कूलचे अध्यक्ष नितीन भोगे,  पंचायत समिती करमाळा विषय साधन व्यक्ती श्री. आदलिंग, कोंढेजचे सरपंच हनुमंत बादल, पत्रकार नंदकिशोर वल्टे, गजेंद्र पोळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!