गुळसडी गावातील पहिल्या वकील अ‍ॅड. प्राजक्ता कुलकर्णी-बारगजे यांचा नागरी सत्कार संपन्न - Saptahik Sandesh

गुळसडी गावातील पहिल्या वकील अ‍ॅड. प्राजक्ता कुलकर्णी-बारगजे यांचा नागरी सत्कार संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गुळसडी (ता.करमाळा) च्या कन्या अ‍ॅड. प्राजक्ता विजयकुमार कुलकर्णी-बारगजे यांनी LLB (वकील) परीक्षेत बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. याबद्दल त्यांचे गुळसडी ग्रामस्थांच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.

गुळसडी गावातून वकील बनणाऱ्या प्राजक्ता या पहिल्याच व्यक्ती आहेत. गुळसडीचे सरपंच प्रमोद भंडारे यांच्या हस्ते प्राजक्ता यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संजय कुलकर्णी,गुळसडी वि.सेवा सह. सोसा.चे चेअरमन संतोष यादव,सरपंच प्रमोद भंडारे,युवानेते हनुमंत बागल, राजेंद्र भागवत, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी प्राजक्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुढे शिक्षण चालू ठेवून न्यायाधीश व्हायचे आहे असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी गुळसडी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!