‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता’ याविषयी निर्भया पथकाने उत्तरेश्वर कॉलेजमध्ये केले मार्गदर्शन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम येथील उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी निर्भया पथक, पोलीस स्टेशन करमाळा यांचे वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता याविषयी विशेष मार्गदर्शन शिबिर झाले. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे हेमंत पाडूळे व शहाजी डुकरे हे उपस्थित होते.

या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात श्री हेमंत पाडूळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना येणाऱ्या अडीअडचणी सांगून त्यावर कायदेशीर मार्गदर्शन केले. निर्भया पथकाच्या मदतीने विद्यार्थिनींच्या अनेक शंकाचे निरसन केले. यावेळी त्यांनी कॉलेजमधील मुला मुलींना ऑनलाइन गुन्हे व त्यातून निर्माण होणारे कायदेशीर प्रश्न याविषयी मार्गदर्शन केले.
हा विशेष कार्यक्रम प्राचार्य सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे , प्रा.संतोष रणदिवे , प्रा.सतीश बनसोडे हे उपस्थित होते. यावेळी कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





