केमच्या श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये ‘कथालेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : केम (ता.करमाळा) श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्येष्ठ साहित्यिका आणि इयत्ता बारावी मराठी पाठ्यपुस्तकातील ‘गढी’ या पाठाच्या लेखिका डॉ.प्रतिमा इंगोले यांनी येथील विद्यार्थ्यांची सोबत संवाद साधला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री एस.बी.कदम हे होते.
या ऑनलाईन संवाद कार्यक्रमांमध्ये प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ‘ कथालेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला ‘ या कार्यक्रमामागील भूमिका सांगितली, केम सारख्या ग्रामीण भागात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी दर आठवड्याला नवनवीन शैक्षणिक नवोपक्रम राबविले जातात, त्याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल आणि चिकित्सेचे समाधान करीत डॉ.प्रतिमा इंगोले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यासोबत संवाद साधला.
या कार्यक्रमामध्ये डॉ.प्रतिमा इंगोले यांचा जीवनपट, त्यांच्या लिखाणामागील प्रेरणा , गढी हा पाठ लिहिण्यामागील भूमिका, या कथेतील वेगवेगळी प्रतीके, विदर्भातील बोलीभाषा, बापू गुरुजी या समाजसेवकाची सामाजिक तळमळ याविषयी विद्यार्थ्यासोबत अनेक बाबीवर चर्चा झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांचे , त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे , प्रा.संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे, प्रा. पराग कुलकर्णी, प्रा. अमोल तळेकर यांनी सहकार्य केले. तर आयसीटी लॅब प्रमुख श्री सरफराज मोमीन सर व श्री सागर महानगर यांनी तांत्रिक सहकार्य केले. केम सारख्या ग्रामीण भागात प्रथमच इयत्ता बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमाचा आस्वाद घेतला व आनंद व्यक्त केला.