शाळेत शिक्षकाची नेमणूक करावी यासाठी चक्क विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयावर काढला मोर्चा

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील वांगी नंबर एक येथे गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सदर शाळेमध्ये त्वरित शिक्षकाची भरती करावी अशी मागणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गटविकास अधिकारी कार्यालय समोर मोर्चा काढून निवेदनाद्वारे केली आहे.
वांगी नंबर एक जिल्हा परिषद शाळेत रिक्त जागेवर अद्याप शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही याबाबत वांगी येथील ग्रामस्थांनी व पालकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करमाळा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून पंचायत समिती समोर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला व विद्यार्थ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

गेल्या सहा महिन्यांपासून वांगी नं १जि,प,शाळेत शिक्षकाची भरती झाली नाही याच्या निषेधार्थ विदयार्थानी चक्क पंचायत समितीवर मोर्चा काढून पंचयात समिती समोर भरवली शाळा या परिस्थितीत झोळ समाज सेवा यांच्या वतीने विद्यार्थांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली विद्यार्थ्यांच्या मोर्चा ची करमाळा तालुक्यातील पालकातून चर्चा होत आहे.

