Bisbo : कंटाळवाण्या चालू घडामोडी पहा आता मजेदार अॅनिमेटेड गोष्टीच्या रूपात
चित्ररूपातील कथा,अॅनिमेशन लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडत असतात परंतु खूप सारे ॲनिमेशन मालिका, सिनेमे हे लहान मुलांसाठीच बनवलेले असतात. शिवाय या मालिका शक्यतो काल्पनिक कथांवर अवलंबून असतात. त्यामुळे ॲनिमेटेड मालिका मोठ्या वयोगटातील लोक जास्त पाहत नाहीत.
परंतु युट्युब वर Bisbo Marathi हा चैनल आहे ज्यावर भारतातील व जगातील महत्वाच्या घडामोडींवर ॲनिमेशन रूपात कथा दिल्या जातात. यामध्ये राजकारण, गुन्हेगारी विश्व, क्रीडा,मनोरंजन यासारख्या विविध घडामोडी वर व्हिडिओ तयार केले जातात. हे व्हिडिओ खूपच अभ्यासपूर्ण असतात. त्याचे संवाद, दिलेला आवाज, त्याचे सादरीकरण, ऍनिमेशन खूपच अप्रतिम असते.
एक एक व्हिडिओ तयार करण्यामागे फार मोठी मेहनत घेतली जाते. Bisbo या चॅनेलचे भारतातील विविध प्रमुख १० भाषेमध्ये चॅनेल्स आहेत. ज्यामध्ये इंग्लिश, तमिळ, तेलगू, गुजराती बंगाली, मराठी, हिंदी, कन्नड, मल्ल्याळम, उर्दू आदी १० भाषांचे यूट्यूब चॅनेल्स आहे. Bisbo Marathi हा त्यापैकी एक आहे.
मुंबईमधील शाकीर इब्राहिम हे या Bisbo चे संस्थापक आहेत. त्यांनी २०१६ मध्ये हे चॅनेल्स सुरू केले. बिस्बो हा भारतातील सध्या तरी एकमेव चॅनल आहे जो
विविध चालू घडामोडी अॅनिमेटेड रुपात सादर करतो. 2018-19 मध्ये बिस्बो इंडियाला “आशियातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्व चॅनेल्सचे मिळून २० लाखांपेक्षा जास्त subscribers झाले आहेत.
त्यांचा एक व्हिडिओ : महाविकास आघाडीचे सरकार पाडून एकनाथ शिंदेंनी सरकार कसे स्थापन केले याविषयीचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.
देवेंद्र फडणीस व अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी घेऊन स्थापलेल्या सरकार विषयी व्हिडिओ
✍️ इंजि.सुरज हिरडे, मो.८८०५२३८४६४
Also Read – फेक न्यूज, एडिटेड फोटो,व्हिडीओची सत्यता तपासणे गरजेचे – यासाठी विविध टूल्स व चॅनेल्स आहेत उपलब्ध
तुमच्या गाडीवर वाहतूक नियम भंगाचे चुकीचे चलन पडले असेल तर तक्रार कशी करायची