कुंभेज गावचे सुपुत्र निवास कन्हेरे यांच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन सुरू
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील कुंभेज गावचे सुपुत्र चित्रकार निवास कन्हेरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन काल दिनांक २२ ऑगस्ट रोजी मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरी येथे सुरू झाले. हे प्रदर्शन २२ ऑगस्टला सुरू झाले असून २८ ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनाला करमाळा तालुक्यातुन यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, पत्रकार गजेंद्र पोळ, खुशालराव साळुंके व इतर मान्यवर उपस्थित होते. कुंभेज सारख्या छोट्या गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातुन पुढे आलेल्या कलाकाराने मिळविलेल्या यशाबद्दल कन्हेरे यांचे करमाळा तालुक्यातुन कौतुक केले जात आहे.
कन्हेरे यांनी अभिनव कला महाविद्यालयातून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर काही काळ अध्यापक महाविद्यालय, करमाळा येथे कलाशिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून ललित कला प्रकारामध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांचे या आधीही विविध आर्ट गॅलरीत मध्ये चित्रांचे प्रदर्शन झाले आहे. तसेच त्यांनी काढलेल्या ॲस्ट्रेक पेंटिंग या प्रकारातील चित्रांना भारताबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या विविध देशात मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांचे काही जुने चित्रे खालील इंस्टाग्रामच्या पोस्ट मध्ये दिले आहेत. फोटो स्वाईप करा.