करमाळ्यात २२-२३ ऑक्टोबरला सांप्रदायिक भजन व शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथे तालुकास्तरीय भव्य सांप्रदायिक भजन व शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. 22 ऑक्टोबर व 23 ऑक्टोबर असे दोन दिवस ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत नाव नोंदणी करण्याची 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून प्रवेश निशुल्क आहे. भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून करमाळा तालुका भजनी मंडळ व श्रीराम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
या स्पर्धे अंतर्गत खालील स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत-
- सामुदायिक भजन स्पर्धा
- वैयक्तिक भजन स्पर्धा
- वैयक्तिक शास्त्रीय नृत्य स्पर्धा,
- वैयक्तिक शास्त्रीय संगीत स्पर्धा
- वैयक्तिक शालेय संगीत स्पर्धा ( प्रार्थना/ देशभक्ती गीत)
- लोकसंगीत (व्यसनमुक्ती गीत /पर्यावरण गीत)
यातील विजेत्या स्पर्धकांना ५०० रुपये पासून ५००० रुपये पर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दत्त मंदिर, करमाळा येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन हभप भजनसम्राट बापूराव महाराज बागल, हभप रामभाऊ महाराज निंबाळकर हभप ज्ञानेश्वर माऊली झोळ हभप विठ्ठल महाराज पाटील, डॉ.अॅड.बाबुराव हिरडे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे गटविकास अधिकारी मनोज राऊत नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, बाळासाहेब नरारे, दादासाहेब पालके, भीमराव शिंदे, ज्ञानेश्वर फुले, बंडोपंत पानसरे, ज्ञानेश्वर पानसरे, मच्छिंद्र अभंग, नारायण डौले आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संगीत क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहीत करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा तसेच संगीत प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून संगीताचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘संतांचे संगती’ या यूट्यूब चैनल वरून होणार आहे. नाव नोंदणी साठी संपर्क क्रमांक कार्यक्रम पत्रिकेत दिला आहे.
भारतीय संगीत गाऊया, भारतीय वृक्ष लावूया! हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे भारतीय शास्त्रीय संगीत जोपासण्याचा व भारतीय वृक्षांच्या लागवडीस प्रोत्साहीत करण्याचा आमचा (आयोजकांचा) मानस आहे.
– विजय खंडागळे, संगीत शिक्षक, गौंडरे, करमाळा