केम येथील ‘स्वराज्य मर्दानी खेळाच्या’ खेळाडूंनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात सादर केली प्रात्यक्षिके
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – ६ जूनला किल्ले रायगड वर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध खेळाडूंनी, कलाकारांनी, ग्रुपने आपापल्या कला सादर केल्या. करमाळा तालुक्यातील केम येथील स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था या ग्रुपने मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके, शिवकालीन युद्ध कलेची ठराविक प्रकार सादर केले.
प्रात्यक्षिके होण्याआधी या ग्रुपमधील मुलींनी रायगडावरील होळीच्या माळाची स्वच्छता करून रायगडावरील कामकाजाला हातभार लावला. सहा जून रोजी युवराज्ञी संयोगिता राजे भोसले यांच्या हस्ते 350 व्या शिवराज्याभिषेकाचे चिन्ह असलेले सन्मान चिन्ह आणि प्रशस्त प्रशस्तीपत्र देऊन ‘स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या’ ग्रुपला सन्मानित केले.
या मध्ये कुमारी सिध्दी ओस्तवाल, सिध्दी दोंड, स्नेहल चेंडगे, संस्कृती तळेकर, अनुष्का खटके, समृध्दी तळेकर, सौरभ मोरे, प्रिया चेंडगे, सिध्दी तळेकर, सानिका मोरे, अमृता काळे व त्यांचे प्रशिक्षक अक्षय दत्तात्रय तळेकर, यांचा सन्मान करण्यात आला. या बद्ल करमाळा तालुक्यातील शिवप्रेमींनी कौतुक केले आहे.