वांगी १ : शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात १०१ जणांनी केले रक्तदान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : वांगी नं.१ (ता. करमाळा) येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०१ जणांनी रक्तदान केले.
यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांनीही सहभाग घेतला होता. युवा ग्रुप व दत्ताबापू देशमुख मित्रपरिवार यांचे वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. रक्तदान शिबिराचे हे सलग तिसरे वर्ष आहे. देशातील वाढती रक्ताची टंचाई लक्षात घेऊन व रक्तदान मुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकतो म्हणून हा उपक्रम घेतला जात आहे. सदर कार्यक्रमास वांगी पंचक्रोशीतील प्रमुख नेते मंडळी,सर्व वांगी गावचे सरपंच, ग्रा. पंचायत सदस्य,सोसायटीचे सदस्य, ग्रामसेवक,युवा ग्रुप व दत्ताबापू देशमुख मित्रपरिवाराचे सहकारी व वांगी परिसरातील नागरिक उपस्थीत होते. प्रतिमा पूजन ज्येष्ठ नेते शहाजी देशमुख,बंडगर सर युवराज रोकडे ,भारत साळुंखे, गोरख देशमुख,बंडातात्या देशमुख,सतीश देशमुख,देविदास देशमुख पांडुरंग देशमुख, चंद्रकांत देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच संतोष देशमुख,वांगी 4 चे सरपंच रामभाऊ सुळ, विठ्ठल शेळके, वांगी 3 चे नेते रामेश्वर तळेकर,सर्व सदस्य, दत्ताबापू देशमुख, हरीभाऊ तकिक,तानाजी देशमुख,सचिन देशमुख, धनंजय गायकवाड,निलेश भोसले,सोमा ढावरे,कुमार ढावरे ग्रामसेवक तांबोळी व हनुमंत देशमुख, सोसायटी सदस्य विकास पाटील नितीन देशमुख,उमेश पाटील, ढोकरी गावचे आप्पा चौगुले,अनिल बोरकर,सुनील सांगवे, तसेच बालाजी देशमुख,राज देशमुख, सुधीर देशमुख,दादा पाटील, संजय देशमुख,विशाल मोरे, ओंकार देशमुख, मनोज देशमुख ई उपस्थीत होते

