१ जूनला वाढदिवस असलेल्या केम येथील १०१ ज्येष्ठ नागरिकांचा सामूदायिक वाढदिवस साजरा
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – पूर्वी च्या काळी ज्या मुलांचे जन्म दिवस माहिती नसायचे अशांना त्यांचे शिक्षक शाळेत घेताना १ जून ही जन्म तारीख द्यायचे. त्यामुळे १ जूनला अनेक लोकांचा वाढदिवस असतो. केम (ता.करमाळा) येथे एकाच वेळी १०१ ज्येष्ठ नागरिकांचा वाढ दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम केम येथील ए.पी. ग्रुपच्या वतीने व उद्योजक आजीनाथ लोकरे यांच्या सहकार्याने आगळया वेगळया पध्दतीने येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात १०१ ज्येष्ठ नागरिकांचा (महिला , पुरुष) फेटे बांधून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर वाढदिवसाचा केक कापण्यात आला व त्यांना म्हतारपणीचा आधार म्हणून काठ्यांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर गरीब परिस्थिती वर मात करीत आपल्या मुलाला उद्योजक बनविले याबद्दल आजीनाथ लोकरे यांच्या मातोश्री साखरबाई मारूती लोकरे यांचा सत्कार ए.पी.ग्रुपचेवतीने यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी माजी संचालक गोरख आपा जगदाळे हे होते. या वेळी व्यासपीठावर करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष वारे, संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष नितीन खटके, विष्णू पारखे बापुराव तळेकर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पवार यांनी केली. या वेळी. या कार्यक्रमासाठी महेश तळेकर सर ए.पी. ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, पै महावीर तळेकर, विजय ओहोळ, युवराज तळेकर, संदिप तळेकर विष्णू तात्या अवघडे,कुंडलिक तळेकर बापुराव धाडस तळेकर, वसंत तळेकर सुरेशं गुटाळ, पिनू तळेकर, पांडुरंग तळेकर, राहुल तळेकर रमेश तळेकर सागर राजे तळेकर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले तर आभार या कार्यक्रमाचे संकल्पक विजयसिंह ओहोळ यांनी मानले. या उपक्रमाचे केम व परिसरातील ज्येष्ठ नागरिकानी कौतुक केले.