गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या १० वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : धर्मविर संभाजी विद्यालय गौंडरे प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी 10 वी मध्ये शिकत असलेले 19 मुले व 18 मुली असे मिळुन 37 विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर जगदाळे मामा महाविद्यालय वाशी चे प्राचार्य व मानसशास्त्रतज्ञ श्री.गुंजाळ उपस्थित होते.
याप्रसंगी १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या जवळची व्यक्ती आपल्या हक्काने रागवत असते किंवा मारत असते. परंतु त्याच्या मनात सतत तुम्ही चांगले रहावे किंवा चांगले बनावे वाटत असते. त्याचप्रमाणे शिक्षकही सतत तुमच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हाला रागवत असतात. पुढे बोलताना ते म्हणाले कि, तुम्हाला एक चांगला विद्यार्थी नाही होता आल तरी चालेल परंतू तुम्ही चांगला माणूस मात्र नक्की बनल पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ही आपल्या शाळेतील आठवणी व भावना व्याक्त केल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक बापु निळ सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास माधव हनपुडे, कोळगावचे पोलिस पाटील नितीन पाटील, बिरुदेव कोळेकर, तसेच सर्व प्रशालेचे कर्मचारी व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.