पोफळज येथे जुगार खेळताना ११ जणांना रंगेहाथ पकडले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोफळज येथे २४ मार्चला जुगार खेळताना ११ जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून १० हजार ५०० रूपये रोख जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश सदाशिव फुगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की पोफळज येथे काही लोक जुगार खेळत असल्याचे समजले.
यावर मी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक टिळेकर, हवालदार बेग, पोलीस नाईक पवार, श्री. गोरे, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण सर्वजण तेथे गेलो असता सचिन कांबळे, भारत गव्हाणे, दिगंबर कांबळे, दत्तात्रय धुमाळ, हरिश्चंद्र पवार, शिवाजी धुमाळ, प्रमोद सावंत, सदाशिव हजारे (सर्व रा. पोफळज), संतोष लोखंडे, जालिंदर लोखंडे ( रा. दहिगाव), बाळू जाधव (रा. झरे) हे तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १० हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.



