करमाळ्यात १० जानेवारीला ११वा आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सव

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.७ : येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त ११व्या आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सवाचे आयोजन शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा सांस्कृतिक सोहळा सर्वांसाठी खुल्ला असणार आहे.

या आंतरराष्ट्रीय महोत्सवात वेस्ट बंगाल, तेलंगणा, ओडिसा, आसाम, मध्य प्रदेश, गुवाहाटी आदी राज्यांतील नामवंत कलाकार करमाळ्यात दाखल होऊन आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे करमाळा वासीयांसाठी हा महोत्सव म्हणजे कला व संस्कृतीची पर्वणी ठरणार आहे.

महोत्सवात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, संतूर व तबला वादन, तसेच कथक, भरतनाट्यम, ओडिसी, सत्रिय, रवींद्र नृत्य व कठपुतली अशा विविध नृत्यप्रकारांची रंगतदार प्रस्तुती अनुभवायला मिळणार आहे.
या निमित्ताने अनेक नामवंत कलाकारांना सुरताल संस्थेच्या वतीने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून यश कल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या सहकार्यानेही कलाकारांचा गौरव केला जाणार आहे.

यामध्ये डॉ. मोनिषा देवी गोस्वामी (गुवाहाटी) यांना सुरताल नृत्य साधना पुरस्कार, गुरु इतिश्री पटनायक (पुरी) यांना सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार, गुरु श्रुती पंडित (पुणे) यांना सुरताल नृत्य भूषण पुरस्कार, गुरु सुचरिता घोष (हैदराबाद) यांना सुरताल नृत्य कलाश्री पुरस्कार, कु. दिपनका शर्मा (इंदौर) यांना सुरताल नृत्य गौरव पुरस्कार, कु. अभिप्सा नंदी (कोलकाता) यांना सुरताल कलानिधी पुरस्कार, श्री प्रकाश शिंदे (पुणे) यांना सुरताल वाद्य साधना पुरस्कार, कु. गितिमा दास (गुवाहाटी) यांना सुरताल कला गौरव पुरस्कार तसेच डॉ. विथीका टिकू (जम्मू-कश्मीर) यांना सुरताल कला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय करमाळा तालुक्यातील कला, शिक्षण व योगा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून राष्ट्रहितासाठी सेवा करणाऱ्या व्यक्तींनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. राधिका तांबे घोलप यांना आंतरराष्ट्रीय योगाचार्य पुरस्कार, प्राचार्य मिलिंद फंड व कल्याणराव साळुंखे सर यांना सुरताल संगीत रसिक पुरस्कार, चित्रकार निवास कन्हेरे यांना सुरताल कला गौरव पुरस्कार तसेच संतोष (राजू) जीवनलाल शियाळ यांना आदर्श व्यापारी सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या महोत्सवात विद्यार्थ्यांचे गायन-वादन व कलाकारांच्या सादरीकरणातून अविस्मरणीय सांगीतिक अनुभव मिळणार असल्याचे नमूद करत, करमाळा व तालुक्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वणीचा आस्वाद घ्यावा, असे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी आवाहन केले आहे.