करमाळा व कुर्डुवाडी नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी १८ कोटी आ.संजयमामा शिंदे यांची माहिती…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा व कुर्डुवाडी नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडून १५ कोटी तर पर्यटन व सांस्कृतिक खात्याकडून करमाळा तालुक्यातील संगोबा, शेटफळ (नागोबाचे),चिखलठाण येथील देवस्थान परिसर विकासकामी ३ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
यामध्ये करमाळा पालिका हद्दीतील महात्मा फुले चौक पुतळा ते जि.प.विश्रामगृह रस्ता मजबुतीकरण व स्ट्रीट लाईट बसविणे – १५० लाख,दत्त मंदिर(विकासनगर) ते नवीन न्यायालयीन इमारत रस्ता,मेनरोड व शहराअंतर्गत रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविणे – ४०लाख,आय.सी.आय.सी.आय बँक ते जुनी लाकडी मिल फंड गल्ली (जुना बायपास) रस्ता मजबुतीकरण करणे -१५० लाख,पालिका हद्दीत अभ्यासिका बांधणे -५०लाख,गट नं.३७८ कत्तलखाना रोड (जुना नगर रोड) बेग फकीर दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे -३० लाख,माजी सैनिक कारगिल भवन कंपाऊंड वॉल व सुशोभीकरण करणे -३०लाख,राज्यमार्ग ६८ ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे – १००लाख,दुधे डायगणोस्टिक सेंटर ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे -५०लाख असा निधी मंजूर झाला आहे.
कुर्डुवाडी पालिका हद्दीतील टेम्भुर्णी रोडवरील बेंद ओढ्यावरील पूल बांधणे -९०लाख,करमाळा रोड येथील संजयमामा शिंदे विद्यालय ते ब्रीच कॉर्नरपर्यंत कॅनॉल गटार बांधणे-१२०लाख,पाणी पुरवठा केंद्र येथे सौरऊर्जा पॅनल बसविणे-२००लाख,कुर्डुवाडी शहरात आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविणे-८०लाख,राजमाता अहिल्यादेवी पुतळा परिसर सुशोभीकरण करणे-४०लाख लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरण करणे-४०लाख,पालिका हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीट रस्ते करणे-२००लाख,माढा रोडवरील व्यापारी गाळे नूतनीकरण करणे-१३० लाख अशी कामे मंजूर करण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील श्री आदिनाथ देवस्थान (संगोबा) येथे घाट बांधणे-९०लाख,शेटफळ (नागोबाचे) येथील नागनाथ देवस्थान कल्लोळ तलावास पायऱ्या बांधणे-९०लाख,शेटफळ गावठाण ते नागनाथ देवस्थान पोहोच रस्ता व मोरी बांधणे-२०लाख,चिखल ठाण -१ येथील कोटलिंग देवस्थान पोहोच रस्ता व स्ट्रीट लाईट बसविणे-१००लाख असा निधी मंजूर झाला. आमदार शिंदे यांच्या प्रयत्नशील विकासकामामुळे विविध योजनांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, अनेक विकासकामे मार्गी लागली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.