निमगाव (ह) व गौंडरे येथील विविध कामांसाठी बागल यांच्या माध्यमातून १८ लाख मंजूर
करमाळा (दि.६) – निमगाव (ह) व गौंडरे येथील विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांच्या माध्यमातून १८ लाख ४५ हजार मंजूर झाले असून त्या कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.
करमाळा तालुक्यातील निमगाव (हवेली) येथील विविध कामांसाठी दिग्विजय बागल यांनी ११.७० लाख मंजूर करवून घेतले असून या कामांचे आज दिग्विजय बागल व निमगाव येथील ज्येष्ठ नागरिक भानुदास भोसले यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये निमगाव (ह) येथील रोकडे वस्ती व भोसले वस्ती येथे सिंगल फेज वीज पुरवठा सुरू व्हावा यासाठी ७.५० लाख रुपये व निमगाव हवेली येथील ग्रा. मा.क्र.२३८ लक्ष्मण नीळ सर घर ते टकले / जगदाळे वस्ती या रस्त्यांचे येथील खडीकरण करणे या साठी ४.०० लाख रुपये, भारत जगताप व पोपट जगताप वस्तीवर सौर पथ दिवे या सर्व विकास कामांसाठी एकूण निधी रक्कम ₹११.७० लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील सौ.प्रियंका हनपुडे यांच्या शेतातील वीज पुरवठा सुरू व्हावा व गाव अंतर्गत सौर पथ दिवे बसविणे या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांनी निधी रक्कम रु.६.७५ लाख रुपये मंजूर करून दिला आहे. या कामांचे भूमिपूजन दिग्विजय बागल यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी निमगाव येथील कार्यक्रमास श्री. मकाई सह साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, आदिनाथ सह साखर कारखाना माजी संचालक नामदेव भोगे, श्री. मकाई चे संचालक राजेंद्र मोहोळकर, संचालक पै. अनिल शिंदे अशोक पाटील, माजी सरपंच धर्मराज जगताप, माजी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, सोसायटी चेअरमन अतुल नीळ संचालक विठ्ठल लोहार, माजी सदस्य दादा पाटील, ग्रा. सदस्य भारत जगताप, सोसायटी संचालक राजेंद्र भोसले, भीमराव रोकडे, माधव इंगळे, गाहिनीनाथ रोकडे, आंबृषी भील, दत्ता मामा साळुंखे, दत्ता रोकडे, राजेंद्र ननवरे, हभप खंडू नीळ, माजी सदस्य जगन्नाथ ननवरे, सूर्यभान रोकडे, विठ्ठल रोकडे, राजेंद्र रोकडे, सुभाष भोसले, राजेंद्र भील, छगन शिंदे, सुदाम साळुंखे, सूरज चव्हाण आदी जण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौंडरे येथील कार्यक्रमास उद्योजक गोविंद काका हनपुडे, श्री.मकाई सह साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, श्री.मकाचे संचालक सतीश बापू नीळ, पै. अनिल शिंदे, अशोक पाटील, राजेंद्र मोहोळकर, आदिनाथचे माजी संचालक नामदेव भोगे, माजी सरपंच अशोक हनपुडे, संभाजीराजे हनपुडे,संदीपान रनमोडे, दीपक साळवे, महावीर साळवे, बापू तांबोळी, ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर बिचीतकर, विजय ननवरे, तंटामुक्ती अध्यक्ष अक्षय हनपुडे, मारुती जाधव, किरण काळे, मारुती कांबळे, योगेश हनपुडे, हनुमंत साळवे अमोल साळवे, निखिल साळवे,व ग्रामस्थ उपस्थित होते.