खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी रुपये निधी मंजूर - गणेश चिवटे - Saptahik Sandesh

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी रुपये निधी मंजूर – गणेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधीतून करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी रुपये निधी मंजूर झाला असलेची माहिती भाजपाचे जि.सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की,माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारच्या 25-15 व 12-38 या योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत यामध्ये आवाटी, कंदर, केम, चिखलठाण, जिंती, तरटगाव , पोमलवाडी, भालेवाडी ,वांगी-3, वांगी -4, करंजे, झरे, बिटरगाव श्री, मोरवड, मिरगव्हाण या गावांमधील लोक उपयोगी विकास कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे.

  • मंजूर कामे पुढीलप्रमाणे
  • आवाटी येडेश्वरी मंदिर सभामंडप १० लाख रु.,
  • कंदर पवार घर ते विठ्ठल मंदिर मार्गे संजय थोरे घर रस्ता सुधारणा १० लाख रु.,
  • केम हनुमान मंदिरसमोर सभामंडप १० लाख रु,
  • केम भैरवनाथ मंदिर सभामंडप १० लाख रु,
  • चिखलठाण सुभाष सुराणा घर ते संजय उंबरे रस्ता काँक्रीटिकरण १० लाख रु.,
  • चिखलठाण अर्जुन टिंगरे घर ते जि. प. शाळा रस्ता सिमेंटिकरण १०लाख रु.,
  • जिंती ते पोमलवाडी रस्ता डांबारीकरण १० लाख रु.,
  • जिंती गाव ते रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रीटिकरण १० रु.
  • तरडगाव सभामंडप १० लाख रु.,
  • पोमलवाडी वाचनालय सभागृह १० लाख रु.,
  • भालेवाडी ते जुने गावठाण रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,
  • वांगी नंबर ३ गणपतराव सातव दुकान ते गुरुलिंग पांडेकर घर रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,
  • वांगी नंबर ४ चांद तांबोळी घर ते विष्णू ढवळे घर रस्ता १० लाख रु,
  • रांझनी ओंकारनाथ देवस्थान पेवर ब्लॉक १० लाख,
  • करंजे व्यायाम शाळा बांधणे ५ लाख,
  • झरे अमृळे वस्ती ते बागल वस्ती रस्ता ५ लाख रुपये,
  • झरे चौधरी वस्ती हातपंप ते चंद्रकांत चौध रस्ता काँक्रीटिकरण १० लाख,
  • बिटरगाव श्री जुना करमाळा रस्ता सुधारणे १० लाख,
  • मोरवड व्यायामशाळा बांधणे १० लाख,
  • मिरगव्हाण स्मशानभूमी सुशोभीकरण १० लाख,
  • मिरगव्हाण जुने गावठाण ते शिरसाठ महाराज रस्ता १० लाख रु.

आदी लोकोपयोगी विकास कामे मंजूर केल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेमधून त्यांचे आभार मानले जात आहे, या पुढील नजिकच्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आणखी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी प्रयत्न करत असल्याचेही चिवटे यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!