ड्रायक्लीनसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले १९ हजार रुपये केले परत  - Saptahik Sandesh

ड्रायक्लीनसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले १९ हजार रुपये केले परत 


करमाळा (दि.११) – करमाळा येथील गजराज ड्रायक्लिनर्समधून गेल्या ४० वर्षांत अनेकवेळा ग्राहकांनी ड्रायक्लिनला टाकलेल्या कपड्यांच्या खिशामध्ये मिळालेले रोख रक्कम, सोने,चांदी,मोबाईल,महत्त्वाचे डॉक्युमेंट हे सावरे बंधूनी ग्राहकांना संपर्क करून प्रामाणिकपणे परत केले आहेत.असाच आज दि.१२ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा असाच प्रत्यय समोर आला आहे.

करमाळा शहरातील माजी नगरसेवक संजय भगवान सावंत आणि त्यांचे वडील भगवान सावंत (नाना) यांचे ड्रायक्लिनसाठी आलेल्या कपडे नेहमी प्रमाणे कपड्यांचे खिशे चेक करत असताना दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी वडिलांच्या खिशामध्ये ९०० रु तर १२ सप्टेंबर २०२४ रोजी संजय सावंत यांच्या ड्रायक्लीनसाठी आलेल्या पॅंटचे खिशे चेक करत असताना १८४१० रु रक्कम खिशामध्ये आढळून आली. हे सावरे यांच्या निदर्शनास आले असता ताबडतोब श्री संजय सावंत यांना फोन करून सांगितले की तुमच्या व वडिलांच्या ड्रायक्लिन साठी टाकलेल्या कपड्यांच्या खिशामध्ये रोख रक्कम आली आहे.

शेलगावच्या सरपंचाचे 15 हजार रुपये केले परत – सावरे यांचा प्रामाणिकपणा…

त्यावेळी श्री. सावंत यांना दुकानात बोलावून सावरे यांनी त्यांचे पैसे त्यांना प्रामाणिकपणे परत केले. सावरे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल माजी नगरसेवक संजय सावंत व सावंत गटाचे कार्यकर्ते यांनी गजराज ड्रायक्लीनर्स चे मालक श्री रावसाहेब सावरे यांचा सत्कार करून सावरे परिवाराचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!