श्री उत्तरेश्वर देवस्थान विकासासाठी २ कोटी निधी मंजूर
केम (प्रतिनिधी/संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत देवस्थान श्री उत्तरेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा ब मध्ये वर्ग करण्यात आला. ग्रामीण भागातील यात्रा स्थळांच्या विकासाची विशेष कार्यक्रम सहाय्यक अनुदान योजनेतंगर्त चालू वर्षाचा दोन कोटी रूपये निधी मंदिराच्या विकासासाठी मंजूर झाला आहे अशी माहिती मोहिते पाटिल गटाचे माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या निधीतून पुरूष भक्तनिवास बांधकाम 50 लाख, महिला भक्त निवास 31 लाख क्राॅंकिटकरण रस्ता 19 लाख वाॅल कंपाउड 70लाख वाहनतळ क्राॅंक्रिट करणं 20 लाख व पथदिवे बसविण्यासाठी 10 लाख रूपये अशी कामे होणार आहे.
मी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटिल, माजी आमदार नारायण पाटिल यांच्या सहकार्याने व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्या मार्फत सतत पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे. यामुळे उत्तरेश्वर देवस्थान कायापालट होणार आहे या मंदिराला फार मोठा इतिहास आहे हे हेमांडपंथी मंदिर आहै या ठिकाणी बारव आहे यामधुन सप्तलिंगे निघाली त्यामधील एक श्री उत्तरेश्वर देवस्थान आहे व परिसरात मलवडी येथे रामेश्वर, केम येथे घुटकेश्वर, शंकरेश्वर, दक्षिणेश्वर, केमेश्वर, मदनेश्वर, बसमेश्वर अशी लिंगे आहेत. या देवस्थानची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते या विकास कामामुळे यात्रेकरूंची सोय होण्यास मदत होईल.
केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान आहे या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा ब मिळावा या साठी मी माजी आमदार नारायण पाटिल विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटिल यांच्याकडे या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा या साठी सतत पाठपुरावा केला. या मंदिराला जो पर्यंत तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळणार नाही तो पर्यत मंदिरात येणार नाही असा मी एक ‘पण’ देखील केला होता. अखेर याला यश आले हे माझा जीवनातील भाग्य आहे.
– अजित तळेकर, माजी सरपंच मोहिते पाटिल गटाचे समर्थक
येथील श्री उत्तरेश्वर देवस्थानला तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून दोन कोटी रूपये मंजूर झाले आहेत या मधुन या मंदिराचा कायापालट होणार आहे या मंदिराची प्रसिध्दी होणार आहे.
–मनोज सोलापुरे, सचिव, श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट केम