श्रीराम प्रतिष्ठान तर्फे उद्या ११ फेब्रुवारीला होणार २१ सामुदायिक विवाह सोहळा - विवाहाची जय्यत तयारी - गणेश चिवटे यांची माहिती - Saptahik Sandesh

श्रीराम प्रतिष्ठान तर्फे उद्या ११ फेब्रुवारीला होणार २१ सामुदायिक विवाह सोहळा – विवाहाची जय्यत तयारी – गणेश चिवटे यांची माहिती

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : श्रीराम प्रतिष्ठान तर्फे उद्या ११ फेब्रुवारी रोजी २१ सामुदायिक विवाह होणार आहेत, या विवाहाची जय्यत तयारी झाली असून, हे विवाह करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास होणार आहेत, या विवाहसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे.

याबाबत श्री चिवटे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की, विवाह सोहळ्यात एकूण 21 विवाह सोहळा पार पडणार आहेत, त्यातील एक बौद्ध धर्मीय व हिंदू धर्मीय परंपरेनुसार लग्न विवाह पार पडतील, वर राजासाठी प्रथमच सामुदायिक विवाह सोहळामध्ये मिरवणुकीत घोड्याची व्यवस्था आहे, वधू साठी सर्व मेकअप साहित्य देण्यात येणार आहे, मिरवणुकीमध्ये आकर्षक आतिषबाजी बॅन्जो व हलगी वादन करण्यात येणार आहे, विवाह स्थळी सुसज्ज असे मंडप व आकर्षक डेकोरेशन करण्यात आले आहे, सर्व वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था ही टेबल खुर्च्यांवर करण्यात आले आहे, विवाह स्थळी मनोरंजनासाठी सांस्कृतिक ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, विवाह स्थळी ॲम्बुलन्स शौचालय अग्निशामक इत्यादी आवश्यक सुविधा ठेवण्यात आले आहेत, विवाह स्थळी लग्न मंडपामध्ये जवळपास दहा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे, वर्हाडी मंडळीसाठी सकाळी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भोजन व्यवस्था आहे असेही त्यांनी बोलताना सांगितले.

या पत्रकार परिषदेसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, आजिनाथ सुरवसे, दासाबापू बरडे,विजयकुमार नागवडे, विनोद महानवर, नाना अनारसे, जयंत काळे पाटील, नितीन चोपडे व श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!