२-३ पिढ्या गेल्या पण पोटेगाव-घारगाव रस्त्याचा प्रश्न तसाच!
समस्या – करमाळा तालुक्यातील सीना नदीच्या तीरावर असलेल्या पोटेगावात मागील किती तरी वर्षे दुर्लक्षित असलेला पोटेगाव-घारगाव असा दोन गावे जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला पोटेगावातील ४० ते ५०% लोकसंख्या रहात आहे. पण या रस्ता डांबरी करणे काम काही होत नाही.
इतरवेळी हा रस्ता खराब असल्याने यायला जायला ग्रामस्थांना अडचण होतेच पण पावसाळ्यात या रस्त्यावर फार चिखल होत असल्याने ग्रामस्थांना प्रवास करणे फार कठीण होते. गावात विचारपूस केल्यावर समजले की हा रोड २ ते ३ पिढ्या झाल्या नुसता मंजूर होऊन येत आहे पण त्याचे काम होत नाही. ना ग्रामपंचायत याकडे लक्ष देतेय ना गावातील पुढारी लोक.
आबालवृद्धांना, गरोदर स्त्रियांना दवाखान्यात न्यायचे म्हणले तर आम्ही अशा रस्त्याने कसे न्यायचे, विद्यार्थी शाळेत याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याबाबत आमदारांनी,ग्रामपंचायतीने लक्ष घालून हा रस्ता तातडीने करून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
समस्या मांडणारे – ग्रामस्थ, पोटेगाव, ता.करमाळा
आपल्या परिसरातील समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आमच्या पर्यंत माहिती पोहोचवा – Click Here