एमएससीबीची २५ हजाराची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : राज्य वीज वितरण कंपनीची रोशेवाडी येथील डीपीतील ॲल्युमिनियमची वायर व १९० लिटर ऑईल असा २५ हजार २०० रू. चा ऐवजाची चोरी झाली आहे.
हा प्रकार २० जुलैच्या अगोदर घडला आहे. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ सोमनाथ बळीराम दुधे (रा.पांडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २१ जुलैला सकाळी नऊ वाजता रोशेवाडी येथील लोंढे-मुसळे डिपी बंद असल्याचे कळाले होते.
म्हणून मी व माझा हेल्पर मनोहर साळुंके असे सदर डिपीवर गेलो असता डिपीच्या आतील कॉईल व ऑईल हे कोणीतरी चोरून नेल्याचे लक्षात आले. ॲल्युमिनियमची कॉईल साधारणत: ५० किलो व ऑईल १९० लिटर असे २५ हजार २०० रू. चे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


