मोटारसायकलच्या धडकेत १७ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा :समोरासमोर मोटायसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात १७ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार २५ फेब्रुवारीला रात्री साडेसात वाजता करमाळा-पोथरे रस्त्यावर साक्षी हॉटेल समोर घडला आहे. या प्रकरणी मारूती मच्छिंद्र हिरडे रा. पोथरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २५ फेब्रुवारीला सायंकाळी आठ वाजता माझा मुलगा अर्जुन हा करमाळ्याहून पोथरेकडे येत असताना त्याच्या मोटारसायकलला समोरून सुरज गुणवंत काळे (रा. केडगाव) यांनी त्याच्या मोटारसायकलची जोराची धडक दिली. त्यात माझा मुलगा अर्जुन हा गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडला होता. त्यानंतर त्याला ॲम्ब्युलन्स मधून उपजिल्हा रूग्णालयात नेले. नंतर नगर येथील न्यूरॉन प्लस या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तो २ मार्चला शुध्दीवर आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुरज गुणवंत काळे यांनी हयगयीने व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून माझ्या मुलास गंभीर जखमी केले आहे. या अपघातात दोन्ही मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी सूरज काळे विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





