खाटेर परिवार आयोजित श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले दर्शन यात्रेसाठी 46 भाविकांनी घेतला लाभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : खुश संकेत खाटेर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले तृतीय दर्शन यात्रेचे आयोजन खाटेर परिवारातर्फे करण्यात आले, या यात्रेचे आयोजन पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आले. या यात्रेत जवळपास 46 भाविकांनी लाभ घेतला.
या यात्रेचा शुभारंभ गोसेवा समिती सदस्य सुभाषशेठ बालदोटा तसेच आर्ट ऑफ लिविंगचे जगदीश शिगची यांच्या हस्ते गाडीची पूजा करून करण्यात आले. यावेळी जगदीश शिगची यांनी खाटेर यांचे आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, देवदर्शन यात्रा करणे पुण्याचे काम आहे, पण यात्रा घडवून आणणे हें भाग्यवंताचे काम असून ते सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर करत आहेत. यात्रेतील सर्व भाविकांनी खाटेर परिवाराचे आभार व्यक्त करून या सामाजिक कामावर समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक नारायण तात्या पवार , सुधीर भणगे, प्रकाश मुनोत ,अनंता मसलेकर,आशिष बोरा सतीश शिंगाडे, श्री. देवडीकर,वर्धमान खाटेर, विजय बारीदे, पृथ्वीराज केंगार ,नगरसेविका संगीता खाटेर, मंदाकिनी पवार,विना देवी,यांचेसह अनेक पुरुष, महिला भाविक उपस्थित होते, याप्रसंगी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..

