गणपती फार्मसीमध्ये शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांचे रक्तदान..
करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अकोले खुर्द (ता.माढा) येथील गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंतीनिमीत्त ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटन माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य धनंजय मोरे यांनी केले. शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. विजयराव हिरवे होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध व्याख्याते म्हणून विक्रमसिंह मगर उपस्थित होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी व आजचा तरुण युवक या विषयातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की शिवरायांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जात संघर्ष केला तर हमखास यश मिळते.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेमधून शिवरायांच्या आठवणी जागृत केल्या. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे , उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा.महादेवी भोसले उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचे चरित्र आत्मसात करण्याचे आवाहन केले आणि आभार मानले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्राची पुराणिक,प्रा.रेणुका शिंदे यांनी कार्य केले.