आठ दिवसात सहा लाख 50 हजार रुपयांची रुग्णांना मदत – वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधावा – दिपक पाटणे यांचे नागरिकांना आवाहन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गेली आठ महिन्यात करमाळा तालुक्यातील रुग्णांना साठ लाखापर्यंत मदत झाली असून,गेल्या आठवड्यात पाच लाभार्थ्यांना साडेसहा लाख रुपये मदत झाल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे तालुका समन्वयक दिपक पाटणे व शहर समन्वयक शिवकुमार चिवटे यांनी दिली.

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून मदती करिताआलेल्या रुग्णांचा ऑनलाइन अर्ज घेण्यापासून सर्व कामे व मार्गदर्शन या कार्यातून केले जाते, शिवाय महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार असलेल्या रुग्णालयातून रुग्णांना मोफत उपचार करून दिले जातात, पंतप्रधान वैद्यकीय मदत योजना,सिद्धिविनायक गणपती मंदिर मदती योजना, आदी ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते, वैद्यकीय कक्ष करमाळा कार्यालय प्रमुख रोहित वायबसे 9067171514 यांच्याशी सर्वांनी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे
उपचारासाठी आर्थिक मदत मिळालेली रुग्णांची नावे व मदत मिळालेली रक्कम… मधुकर साहेबराव ठोकळ रा.करमाळा राम मंगल फाउंडेशन पुणे, १ लक्ष रुपये, रमेश धर्मराज घोरपडे रा.करमाळा २ लक्ष रुपये सह्याद्री हॉस्पिटल पुणे, पप्पा बाई साधू हिंदूळे रा.करमाळा विखे पाटील हॉस्पिटल अहमदनगर १ लक्ष रुपये, शुभांगी भांगे – दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे दोन लक्ष रुपये, अंगद देविदास गरड – दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ५० हजार रुपये