तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीरात ६० जणांची तपासणी - 27 रुग्ण ऑपरेशनसाठी पुणे येथे रवाना... - Saptahik Sandesh

तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीरात ६० जणांची तपासणी – 27 रुग्ण ऑपरेशनसाठी पुणे येथे रवाना…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज २७ ऑक्टोबर रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, 27 रुग्ण ऑपरेशनसाठी पुणे येथे रवाना झाले आहेत.

या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध डॉ. तुषार गायकवाड , युवा उद्योजक रोहित वाघमारे , भाजप चे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, गो सेवा समितीचे सदस्य- जगदीश शिगाजी,भाजप चे शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल,नितीन दोशी,शिवसेना नेते संजय शिंदे,राष्ट्रवादी चे अरुण काका टांगडे,दिनेश मुथा, वैभव दोशी आशिष बोरा,यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.

याप्रसंगी तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले की, आतापर्यंत अनेक शिबिरे घेण्यात आली आहेत, या झालेल्या शिबिरांमध्ये आतापर्यंत सुमारे 4700 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यातही करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन श्री.खाटेर यांनी केले. हे शिबीर प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला करमाळा शहरातील श्रीदेवीचामाळ रस्त्यावरील बायपास चौक येथे आयोजित केले जाते

याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांचा वाढदिवसाच्या निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच 27 ऑक्टोबर रोजी ईशान संकेत खाटेर याचा प्रथम वाढदिवस असल्याने यावेळी वाढदिवस साजरा करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानिमित्ताने रुग्णांना मिठाई चे वाटप करण्यात आले.शिबिरासाठी प्रकाश लावंड सर,जैन संघांचे खजिनदार कचरूकाका मंडलेचा, अनंता मसलेकर, गुलाम गोस,संतोष भांड ,कांबळे सर,चंद्रकांत काळदाते , विजय बरीदे ,गिरीश शाह, शशि अप्पा ननवरे,यांच्या सह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत खाटेर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!