‘मकाई’ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 17 जागांसाठी 75 अर्ज दाखल – बागल परिवारातील एकही अर्ज नाही

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : (ता.१८) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 17 जागांसाठी तब्बल 75 अर्ज दाखल झाले असून बागल परिवारातील एकाही सदस्याकडून निवडणूकीसाठी अर्ज दाखल केला गेला नाही, असे पहिल्यांदाच घडले आहे, तसेच एका जागेसाठी एकच अर्ज आला असल्याने एक जागा बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीमध्ये बागल गटाविरुद्ध आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे कार्यकर्ते एकत्र आले असल्याने अनेकांच्या चर्चाना उधाण आले आहे.

या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी अर्ज स्वीकारले. आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक माहुरकर यांनी बंदोबस्त ठेवला होता.
चिखलठाण ऊस उत्पादक मतदार संघात 7, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटात 5, सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी मतदारसंघात 1, मांगी ऊस उत्पादक मतदारसंघात 10, पारेवाडी ऊस उत्पादक मतदारसंघात 11, महिला राखीवमध्ये 11, भिलारवाडी ऊस उत्पादक मतदारसंघात 9, वांगी ऊस उत्पादक मतदारसंघात 8, इतर मागासवर्ग प्रतिनिधी मतदारसंघात 6, अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघात 7 अर्ज दाखल झाले आहेत.
भिलारवाडी ऊस उत्पादक गट : आप्पा जाधव, सुनीता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झुंजुर्णे, काशिनाथ काकडे, बाबुराव अंबोधरी, संतोष झांजुर्णे व प्रवीण बाबर.
वांगी उत्पादक मतदार संघ : सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनीषा दौंड, तानाजी देशमुख, तानाजी देशमुख, सुधीर साळुंखे व अमित केकान.
चिखलठाण ऊस उत्पादक गट : सतीश निळ, सतीश निळ, दिनकर सरडे, नंदकुमार पाटील, निर्मला इंगळे, अण्णासाहेब देवकर व अण्णासाहेब सरडे.
मांगी ऊस उत्पादक गट : दिनेश भांडवलकर, रोहित भांडवलकर, अमोल यादव, रवींद्र लावंड, विशाल शिंदे, सुभाष शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे, हरिश्चंद्र झिंजाडे, सुभाष शिंदे व संतोष वाळुंजकर.
पारेवाडी ऊस उत्पादक मतदारसंघ : उत्तम (बाळासाहेब) पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, माया झोळ, रामदास झोळ, संतोष पाटील, स्वाती पाटील, प्रवीण बाबर, भाऊसाहेब देवकाते व गणेश चौधरी.
महिला राखीव मतदार संघ : सुनीता गिरंजे, पार्वती करगळ, आशाबाई भांडवलकर, माया झोळ, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ, सवितादेवी राजेभोसले, कमल पाटील, अनिता गव्हाणे व अश्विनी फाळके.
इतर मागासवर्ग प्रतिनिधी : अंकुश भानोसे, अनिल अनारसे, शितल अनारसे, मारुती बोबडे, जया झिंजाडे व जया झिंजाडे.
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी मतदारसंघ : आशिष गायकवाड, सुषमा गायकवाड, गणेश कांबळे, अर्जुन गाडे, अशोक जाधव, धनंजय काळे व समाधान कांबळे.
भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ : कैलास कोकरे, बापू चोरमले, भगवान ढोबाळे, राजश्री चोरमले व विशाल शिंदे.
सहकारी संस्था व पनन संस्था प्रतिनिधी मतदारसंघ : नवनाथ बागल.
