चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सैनिक अनिल साखरे प्रमुख पाहुणे मेजर आकाश पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड, उपाध्यक्ष हरिश्चंद्र बारकुंड, सदस्य बाबुराव अवसरे, पालक-शिक्षक संघाचे सदस्य बाबुराव लबडे, विकास गव्हाणे, हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्वागतगीत, ध्वजगीत , भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्राव्या तुकाराम वायसे या सिनिअर केजी च्या विद्यार्थीनीने देशभक्तीपर गीत सादर केले.
ATS,ITS, बुद्धिवंत व मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच वार्षिक परीक्षा 23-24 मधील गुणवत्ता यादीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्रे व बक्षिस प्रदान करण्यात आले. ATS व इतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक वाघमोडे मॅडम, पाटकूलकर मॅडम व कोठारी मॅडम यांचा सुद्धा सन्मान या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्षभर एकही सुट्टी न घेतलेल्या शिक्षिका पटकूलकर यांना रोख रुपये 5000/- रुपये देऊन गौरविण्यात आले. “इंग्रजी विषयातून सेट परिक्षा” उत्तीर्ण झाल्याबद्दल शिक्षक श्री. जाधव सर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच क्रिडा शिक्षक श्री. शेवाळे सर यांना पहिला “खशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती संघटक पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बारकुंड, मुख्याध्यापक कसबे सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ड्रायव्हर बंधू यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढेंबरे सर , ननवरे मॅडम, माने मॅडम, वाघमोडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. हराळे सर यांनी केले.



