करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी ७९.७० टक्के मतदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील कावळवाडी, रामवाडी, भगतवाडी, जेऊर, चिखलठाण, राजुरी, केत्तूर, गौडरे, कंदर, केम, कोर्टी, वीट, निंभोरे, घोटी व रावगाव येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी आज (ता.५) ७९.७० टक्के मतदान झाले आहे.
करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी ८८ मतदान केंद्रावर मतदान झाले. यामध्ये भगतवाडी येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक ९७.१८% टक्के मतदान झाले असून, सर्वात कमी केत्तूर येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये ४८.६८% टक्के मतदान झाले आहे.
या निवडणुकीत ४९ हजार ९५० मतदार होते. त्यात २६ हजार ५७७ पुरुष व २३ हजार ३७३ महिला मतदार होते. त्यापैकी ३९ हजार ८०८ मतदारांनी मतदानाची हक्क बजावला असून, त्यात २१ हजार ५४५ पुरुष व या हजार २६३ महिला मतदार आहेत. य निवडणूकीसाठी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या नियंत्रणाखाली मतदान प्रक्रिया झाली आहे. याप्रसंगी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ताफा सर्व ठिकाणी तैनात ठेवण्यात आला होता. तालुक्यातील अनेक मतदार केंद्रावर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी भेटी दिल्या. त्यामुळे सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे झालेले मतदान आकडेवारीत..






