करमाळा येथे मुळव्याध संबंधी शिबिरात ८१ रुग्णांची करण्यात आली तपासणी - Saptahik Sandesh

करमाळा येथे मुळव्याध संबंधी शिबिरात ८१ रुग्णांची करण्यात आली तपासणी

करमाळा (दि.३०) –  करमाळा शहरामध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन मुळव्याध आजारासंबंधी महाराष्ट्र राज्यामध्ये नामांकित असलेले डॉ श्री प्रदीप तुपेरे व त्यांचे समवेत असलेले नामांकित डॉक्टर व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शिबिराचे आयोजन केले होते.

सदर शिबिरामध्ये ८१ रुग्णांनी  सहभाग नोंदवला. मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी विविध तपासण्या करून काही ऑपरेटिव्ह असणाऱ्या नागरिकांचे ऑपरेशन करण्यात आले. या सर्व सुविधा नामात्रदरामध्ये या शिबिरामध्ये देण्यात आल्या. जाधव -पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा असणारे डॉ रोहन पाटील यांच्या आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये 81 रुग्णांनी तपासणी करून घेतली. त्यासाठी जाधव -पाटील हॉस्पिटल मधील त्यांचे डॉक्टर्स व संबंधित कर्मचारी यांनी सहकार्य करून नागरिकांना उत्तम अशी सेवा देण्यात आली. जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये इथून पुढेही करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रोगासंबंधीच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे नमूद केले शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिव श्री अभिजित पाटील, डॉ शिवानी पाटील, श्री अजिंक्य पाटील, श्री तात्यासाहेब जाधव, श्री प्रमोद जगदाळे, श्री महादेव भोसले यांनी प्रयत्न केले.

त्याचबरोबर आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषय व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!