टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ८२ जणांनी केले रक्तदान - १ तारखेला भव्य मिरवणूक - Saptahik Sandesh

टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ८२ जणांनी केले रक्तदान – १ तारखेला भव्य मिरवणूक

करमाळा (दि.२९) – काल (दि.२९) शहरातील गवंडी गल्ली मध्ये टिपू सुलतान यांच्या २७३ व्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ८२ जणांनी रक्तदान केले.

करमाळा येथील टिपू सुलतान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी करमाळा शहरात टिपु सुलतान यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरी केली जाते. यंदा देखील रक्तदान,कॅरम स्पर्धा,भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. काल (दि.२९) करमाळा शहरातील गवंडी गल्लीतील मक्का मशिदी समोरील हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. येत्या १ डिसेंबर रोजी करमाळा शहरातून भव्य मिरवणूकिचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे उद्घाटन पोलिस निरीक्षक विनोद घुगे व शहरातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थित होणार आहे.

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले

यावेळी जयंती अध्यक्ष बबलु पठान,मिरवणूक प्रमुख शाहरूख नालबंद,खजिनदार ईरफान सय्यद,राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सोहेल पठान,शाहरूख पठान टिपु सुल्तान समितीचे पदाधिकारी सुफरान शेख, अजहर शेख,अन्वर बागवान, अख्तर शेख, आकिब बागवान,अनस बागवान,सनी बादाडे, बाशिद शिकलकर, आरमान शेख, समिर पठाण, साहिल पठान, दिदार पठान आदी जण उपस्थित होते. यावेळी रोहीत दादा फाउंडेशनचे मुस्तकीम पठान(एम डी) यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!