केम येथे ९ लाख ८० हजाराची चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : केम येथे घराचा दरवाजा उघडून घरात घुसून कपाटातून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा ९ लाख ८० हजार रूपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. हा प्रकार ८ एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी प्रभाकर मारूती शिंदे (रा. केम) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ७ एप्रिलला आम्ही सर्वजण जेवण करून झोपलो होतो. पहाटेच्या सुमाराला मी उठलो असता, आमच्या घरात चोरट्यांनी घुसून कपाटातील पावणेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिणे व साडेचार लाख रूपये रोख रक्कम असा ९ लाख ८० हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक टिळेकर हे करत आहेत.


