करमाळा तालुक्यातील 104 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 94 कोटी 29 लाख निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी करमाळा तालुक्यातील 104 गावांना प्रशासकीय मान्यता दिलेली असून, अर्जुननगर ,घारगाव, घोटी, हिवरवाडी, निमगाव ह, शेटफळ ,हिंगणी, वडगाव दक्षिण, वडगाव उत्तर व केम या 10 गावातील कामांची वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली आहे. उर्वरित 94 कामे ही टेंडर प्रोसेस मध्ये आहेत , तर बाकी 10 गावांमध्ये जल जीवन मिशन योजना राबविण्यासाठी चे सर्वे व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
करमाळा तालुक्यातील 104 गावांसाठी 94 कोटी 29 लाख 10 हजार 596 रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. जल जीवन मिशन योजने मधून पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी विहीर खोदणे, मुख्य पाईपलाईन ,टाकी बांधणे व गावासह प्रत्येक वाडी – वस्तीवरील घरांमध्ये नळ कनेक्शन देणे आदी कामे या निधीमधून राबवली जाणार आहेत.
करमाळा तालुक्यासाठी गावनिहाय मंजूर असलेला निधी पुढीलप्रमाणे…
अर्जुननगर – 5273997/-,घारगाव – 6583512/-, घोटी – 3192689/-,हीवरवाडी – 5341359/-, निमगाव ह – 11527473/-, शेटफळ – 9249433/-,हिंगणी – 6647150/-, वडगाव दक्षिण – 5677517/-, वडगाव उत्तर – 3152280/-, केम – 19998264/-, देलवडी -7813141/-, गौंडरे – 11151366/-, गोयेगाव – 2889855/-, गुळसडी – 14492197/-,केतुर 1 आणि 2 – 23122691/- कोळगाव – 7297530 /-, निंभोरे – 10006172/- , पिंपळवाडी – 4546993/- , रोशेवाडी – 6397113 /-,सरपडोह – 2478432 /-चिकलठाण 1 आणि 2 – 17215706 /- आळसुंदे – 8588874/- भगतवाडी – 700000/- भिलारवाडी – 700000/- ,भोसे – 7149140 /-,बोरगाव – 10197237/- , धायखिंडी – 5705887/-, दिलमेश्वर – 4282211/-, घरतवाडी – 3582678/- ,गोरेवाडी – 5689033/-, गुलमोहरवाडी – 4015218/- , हिवरे – 9587435 /-, जातेगाव – 12023553 /-,जेऊरवाडी -5506807/-, कात्रज – 2720685/-, खांबेवाडी – 5649241 /-, कोंढार चिंचोली – 3587740/-, कोंढेज – 11338738/-, कुंभारगाव – 11886723/-, लिंबेवाडी – 4262968/-, नेरले – 9562419-,पोफळज – 13717046/- ,पुनवर – 8803982/-, रीटेवाडी – 5302872 /-, साडे – 9457536 /-, सालसे – 9202976 /-, सावडी – 15984074 /-, शेलगाव वांगी – 16319484/-, वडशिवणे – 9222053 /-, वंजारवाडी – 5881751 /- , वडाचीवाडी – 7988554/- , वांगी 1 – 16625615 /-, वांगी 2 – 4576773 /-, झरे – 14924501/-, पाथर्डी – 8763974 /-, हुलगेवाडी – 3288898 /-, कुस्करवाडी -2867002/-, शेलगाव क – 8068318 /-, सौंदे – 7989244 /-, बाळेवाडी – 8067688 /-, मिरगव्हाण – 8771595 /- पांडे – 12362615 /-, राजुरी – 14961050/-, पोथरे- 14771070 /-, वरकटने – 9567657 /-, कावळवाडी – 4210950 /-, भगतवाडी – 4915291 /-, बिटरगाव श्री – 5768340 /-, दहिगाव – 6980161 /-, दिवेगव्हाण – 6350465 /-, कोर्टी – 15620429 /-, मांगी – 13478300/-, मांजरगाव – 4076224 /-, फिसरे – 6960268 /- पोमलवाडी – 11162809 /-, पोटेगाव – 5379530 /-, रावगाव – 19885602 /-, टाकळी – 8819554 /-, तरडगाव – 3139598 /- आळजापूर – 5022333/-, खडकेवाडी – 7126697 /-, पोंधवडी – 7179175 /-,रामवाडी – 8506371/-, विहाळ – 12008957/-, भिलारवाडी – 11100876/-, खातगाव – 14286946 /-,कुंभेज – 17088330 /-, उमरड – 29778282 /-, जेऊर – 31182110/- ,कंदर – 19393764 /-,खडकी – 6949970 /-, मलवडी – 9881877 /-,वरकुटे – 9037520 /-, उंदरगाव – 5227346 /-, वाशिंबे – 8744356 /- , करंजे – 83755974 /-,जिंती – 15609321 /-, वीट – 13065017 /-, वांगी 3 – 5540034/-, पांगरे – 11374080 /-, सातोली – 8232403 /-, कामोणे – 1629377 /-, पाडळी – 4690631 /-, भिवरवाडी – 5772973 /-
याप्रमाणे 104 गावांसाठी 94 कोटी 29 लाख 10 हजार 596 रुपये निधी मंजूर आहे. या मंजूर निधी मधून वर्षभरामध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण होतील व प्रत्येक गावासह वाडी - वस्ती वरती पिण्याच्या पाण्याचा नळ असेल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. ज्या वाडी वस्ती जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राहिल्या असतील त्यांचे सर्वे करण्याच्या सूचनाही पाणीपुरवठा विभागाला आपण दिलेल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीने तशी मागणी पाणीपुरवठा विभागाकडे करावी असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले आहे.
