पांगरे येथे नेत्र तपासणी शिबिर – 98 जणांनी घेतला लाभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : इंदापूर येथील कृष्णदृष्टी आय केअर हॉस्पिटलच्या मार्फत डॉ. गीता मगर यांच्याकडून मौजे पांगरे ग्रामपंचायत येथे मोफत नेत्र तपाणी व मार्गदर्शन शिबिर एक एप्रिल 2024 रोजी संपन्न झाले. या शिबिरामध्ये गावातील 98 जणांनी डोळ्याची तपासणी करून घेतली आहे.
यावेळी डाॅ. रवी चव्हाण, परिचारिका अदित सूर्यवंशी, परिचारिका पौर्णिमा लांडगे त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. डॉक्टर व स्टाफ यांचे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ विजया दत्तात्रय सोनवणे व उपसरपंच सौ मनीषा धनंजय गायकवाड त्याचबरोबर माजी उपसरपंच, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ, माजी उपसरपंच गणेश वडणे तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले.


