सव्वापंधरा वर्षाच्या मुलीस पळविले..


करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : सव्वापंधरा वर्षाच्या मुलगी घरात कोणी नसताना ती बेपत्ता झाली आहे. हा प्रकार १५ ऑक्टोबरला दुपारी एक ते चार या वेळेत शेलगाव (वीराचे) येथे घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की.. माझा मुलगा आजारी असल्याने मी त्याला दवाखान्यात घेऊन आले होते. बाकीचे लोक कामाला गेले होते.
माझी १५ वर्षे चार महिने वयाची मुलगी घरी एकटीच होती. दवाखान्यातून मी दुपारी चार वाजता घरी गेले असता माझी मुलगी मला दिसली नाही. सर्वत्र चौकशी केली तरी ती आढळून आली नाही. यावरून तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.


