कंदर येथे दुचाकीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

करमाळा संदेश /प्रतिनिधी
कंदर गावाजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात प्रकाश बारेला (वय १७, रा. मूळ जामपटी, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, सध्या रा. कंदर, ता. करमाळा) हा आपल्या कुटुंबासह कंदर येथे राहत होता व मजुरीचे काम करत होता.
दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास तो कामानिमित्त कंदर चौक परिसरात गेला असताना रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी साहील सलीम पठाण (रा. कंदर, ता. करमाळा) याने त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या होंडा शाईन दुचाकीवरून निष्काळजीपणे व वेगाने वाहन चालवत प्रकाश यास जोरदार धडक दिली.

त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचे मूळ गावी अंत्यसंस्कार केले.

