वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सावडीच्या तलाठी बाबरे यांच्याकडून शाळेला बेंच भेट

करमाळा :सावडी (ता. करमाळा)येथील तलाठी वेदांती बाबरे यांनी 30 नोव्हेंबर रोजी असलेल्या आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत श्री दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, सावडी येथे 5,600 रुपये किमतीच्या बेंचचे वाटप केले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, सचिव दत्तात्रय जाधव व शिक्षकवर्गाने तलाठी वेदांती बाबरे यांचे आभार मानत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील एका विद्यार्थिनीच्या हस्ते बाबरे यांचा सन्मान करण्यात आला.
याआधीही अनेक नागरिकांनी शाळेला बेंच भेट देत सामाजिक बांधिलकी जपली असून, या उपक्रमातून समाजहिताचा हा सुंदर वारसा पुढे चालू ठेवण्यात आला आहे.




