करमाळा येथे महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने काल(दि.११) करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आल. या शिबिराचे उद्घाटन डॉ सादीक बागवान व बालरोगतज्ज्ञ डॉ प्रशांत करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात ९० रक्तदात्यांनी रक्त दान करून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रक्त दालनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. हे रक्त दान शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.