ऊत्तरेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त केम येथे रक्तदान शिबीर संपन्न

केम(संजय जाधव) :श्री उत्तरेश्वर महाराज यात्रेनिमित्त केम येथे उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि उत्तरेश्वर रक्तदाते संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन बिभीषण तळेकर व देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते झाले.

या शिबिरात कुर्डुवाडी ब्लड सेंटर यांच्यामार्फत रक्तसंकलन करण्यात आले. एकूण ४० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
कार्यक्रमास देवस्थानचे सर्व विश्वस्त, मंदिराचे पुजारी, रक्तदाते संघटनेचे कार्यकर्ते, पत्रकार संजय जाधव, दाऊद शेख तसेच प्रथम रक्तदाता गोरख शिंदे उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव दत्तात्रय कुलकर्णी यांनी आभार मानले.

गेल्या २० वर्षांपासून यात्रेनिमित्त सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, केम व परिसरातील रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


