दारू पिऊन बोलोरो चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

दारू पिऊन बोलोरो चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा : दारू पिऊन जामखेड चौकात पीकअप चालवताना एकजण आढळला असून त्यात पोलीसांनी पकडून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० मार्चला पहाटे दोनच्या सुमारास जामखेड चौकात घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मयुर नागेश कदम यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की आम्ही जामखेड चौकात ऑलआऊट ऑपरेशनच्या अनुषंगाने नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहनाची तपासणी करताना रवी प्रकाश बेलाराम बिश्नोई रा. बालाजी स्टील, बायपास रस्ता करमाळा. हा दारू पिऊन पीकअप चालवत असताना आढळून आला. त्याची ब्रेक अॅनालायजर मशीनद्वारे तपासणी केली असता तो दारू पिल्याचे सिध्द झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!